विजय पवारची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
शंकर कनिष्ठ महाविद्यालयाचे विभागीय कुस्ती स्पर्धेत
नांदेड : येथील कै. शंकरराव पाटील मेमोरियल एज्युकेशन सोसायटी, नांदेड संचलित शंकर कनिष्ठ महाविद्यालय (कौठा) येथील विद्यार्थ्याने लातूर विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत यश मिळवले आहे.विभागीय क्रीडा स्पर्धेअंतर्गत पार पडलेल्या १९ वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत ८६ किलो वजन गटातून विजय गजानन पवार याने प्रथम क्रमांक पटकावला. या घवघवीत यशासह त्याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजयच्या या यशाबद्दल, तसेच त्याला मोलाचे मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक प्रा. ए. जी. जाधव व त्याच्या पालकांचे खासदार प्रा. रविंद्र वसंतराव चव्हाण, केशवराव चव्हाण, राजु पाटील काळे, आनंदराव चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य गोविंदराव मेथे, सचिव प्रा. तिरुपती मेथे, इंजि. विलास पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य एस. बी. धात्रक यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. विजयच्या या यशामुळे सर्व स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या यशामुळे क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! या QR code वर Scan करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.

