Home ALL News उद्योजकतेवरील मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना रोजगारनिर्मितीची दिशा

उद्योजकतेवरील मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना रोजगारनिर्मितीची दिशा

उद्योजकतेवरील मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना रोजगारनिर्मितीची दि

​नांदेड : विद्यार्थ्यांनी नोकरीच्या संधी शोधण्याबरोबरच उद्योजकतेच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचा मार्ग स्वीकारावा. उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी श्री. शंकर पवार यांनी केले. सायन्स महाविद्यालयातील इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड स्टार्ट-अप सेलमार्फत आयोजित कार्यक्रमात त्यांनी उद्योजकतेच्या विविध संधी, आवश्यक कौशल्ये आणि शासकीय सहाय्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
​कार्यक्रमाचे अध्यक्ष सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. लक्ष्मण शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “जो रोजगार निर्माण करतो, तोच खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करतो,” असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी केवळ रोजगार मिळविण्यावर भर न देता रोजगारनिर्मितीची क्षमता विकसित करावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रमुख पाहुणे समर्थ इंडस्ट्रीज, नांदेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. संतोष अमिलकंठवार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

​सायन्स कॉलेज, नांदेड व एमसीईडी, नांदेड यांच्या संयुक्त सहकार्याने मार्च–एप्रिल २०२६ मध्ये सायबर सिक्युरिटी आणि आयओटी या विषयांवर दोन महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रोग्राममध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रोग्राम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रशस्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एमसीईडी–बार्टी प्रोग्रामचे समन्वयक तथा इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड स्टार्ट-अप सेलचे कन्व्हेनर डॉ. विजय किरण नरवाडे यांनी केले, तर डॉ. प्रशांत सुतकर यांनी आभार मानले.​यावेळी डॉ. उल्हास पत्की, डॉ. संगीता मोदी, प्रा. श्रीकांत दुलेवाड, प्रा. रोहित गावित, प्रा. सुनील कदम, प्रा. कार्तिक जाधव, डॉ. दीपा बोगले व वंदना लांडगे यांची उपस्थिती होती.

​#Nanded #NandedNews #ScienceCollegeNanded

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here