भास्कर पन्नमवाड यांची पवित्र पोर्टलद्वारे नाशिक जिल्हा परिषदेत पदवीधर शिक्षकपदी निवड!
मुखेड प्रतिनिधी (विठ्ठल कल्याणपाड): जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर यश कसे संपादन करता येते, याचे उत्तम उदाहरण मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा (बु) येथील तरुण भास्कर गिरीदास पन्नमवाड याने दाखवून दिले आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातील पार्श्वभूमी असलेल्या भास्करची महाराष्ट्र शासनाच्या ‘पवित्र पोर्टल’ अंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेत पदवीधर शिक्षक म्हणून नुकतीच निवड झाली आहे.
भास्करचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व माध्यमिक शिक्षण शांती निकेतन विद्यालय, आंबुलगा येथे पूर्ण झाले. शिक्षण घेताना लहानपणापासुनच अभ्यासात मेहनत घेणारा व जिद्दी मुलगा म्हणून त्याची गावात ओळख आहे. उच्च शिक्षणात त्याने एम. ए., बी.एड. (मराठी) ही पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली.
आपल्या ध्येयाप्रती सातत्य ठेवत भास्करने केंद्र सरकारची CTET परीक्षा यशस्विपणे उत्तीर्ण केली. त्यानंतर अत्यंत बिकट आणि काठिण असलेली TAIT (शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी) परीक्षेत तब्बल १३५ गुण मिळवून त्याने देदीप्यमान यश संपादन केले. या गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलच्या पहिल्याच फेरीत त्याची नाशिक जिल्हा परिषदेत पदवीधर शिक्षक म्हणून निवड झाली आहे.
त्याच्या या उत्तुंग यशामुळे आंबुलगा गावाच्या तसेच मुखेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. भास्करच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा आणि भावी प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
#भास्करपन्नमवाड #नाशिकजिल्हापरिषद #पवित्रपोर्टल
#पदवीधरशिक्षक #TAITExam #यशाचीगाथा #मुखेड #आंबुलगा#शिक्षकभरती #अभिनंदन #PavitraPortal #NashikZP #TETExam #CTETExam#MarathiNews #MukhedNews #TeacherRecruitment #SuccessStory
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! या QR code वर Scan करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.

