योगातील उल्लेखनीय कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय योगपटू सोपानराव काळे यांचा सत्कार
नांदेड : नांदेड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, विजय नगर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगपटू सोपानराव काळे यांचा योगातील उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच सत्कार करण्यात आला.
सोपानराव काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून योग क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहेत. परिसरातील नागरिकांसाठी निःशुल्क योग वर्ग आयोजित करणे, शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक आसनांचे प्रशिक्षण देणे, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय योगासन स्पर्धांचे आयोजन करणे आणि योग क्षेत्रातील गुणवंतांचे सत्कार आयोजित करणे यांसारखे अनेक उपक्रम ते सातत्याने राबवत आहेत. त्यांच्या या सामाजिक व योग क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन हा सत्कार करण्यात आला.
हा सत्कार सोहळा आनंदराव जाधव, दिगंबर पावडे, गणेशराव मस्के व बाबुराव कदम या मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला. मान्यवरांनी सोपानराव काळे यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व गौरव चिन्ह प्रदान करून गौरवले.या सत्काराबद्दल ज्येष्ठ विधि तज्ज्ञ बालाजीराव भोसले, लक्ष्मणराव पुयड, योग शिक्षक किशनराव भवर, अशोक नातेवाड, राघव दंडे, मीना कदम व शिल्पा शिंदे यांनी सोपानराव काळे यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! या QR code वर Scan करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.

