Home Education नांदेडमध्ये स्टेनो विद्यार्थ्यांचे १३ दिवसांपासून आमरण उपोषण

नांदेडमध्ये स्टेनो विद्यार्थ्यांचे १३ दिवसांपासून आमरण उपोषण

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (0.46714255, 0.4153124);sceneMode: 2621440;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 47;
  • ​शासनाने लघुलेखक संवर्ग ‘मृत’ घोषित केल्याने विद्यार्थ्यांचा आक्रोश; स्थानिक नेत्यांच्या भेटी निष्फळ ठरल्याचा आरोप

नांदेड : महाराष्ट्र शासनाने ५ मे २०२६ च्या शासन निर्णयातील परिशिष्ट २६ नुसार लघुलेखक (Stenographer) संवर्ग ‘मृत संवर्ग’ घोषित केल्याच्या निषेधार्थ नांदेड येथे ‘युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य’च्या वतीने २५ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाचा १३ वा दिवस उजाडला तरी प्रशासनाकडून योग्य दखल न घेतली गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. दरम्यान, उपोषणकर्ते विद्यार्थी भगवान पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना यापूर्वी श्री गुरू गोबिंदसिंगजी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, २ सप्टेंबरपासून पूजा भुरखे या विद्यार्थिनीनेही उपोषण सुरू केले आहे. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेले विद्यार्थी दिवस-रात्र येथे ठिय्य मांडून आहेत.

नांदेडमधील ​स्थानिक मोठ्या नेत्यांनी आंदोलनस्थळी भेटी दिल्या असल्या तरी मागण्या सोडवण्यासाठी ठोस आश्वासन दिले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. ५ मे २०२६ च्या जीआरमधील परिशिष्ट २६ रद्द करून लघुलेखक संवर्ग पुनरुज्जीवित करावा, सर्व विभागांतील रिक्त पदांची पारदर्शक भरती सुरू करावी, तंत्रज्ञानानुसार कर्मचाऱ्यांना AI व डिजिटल टंकलेखनाचे प्रशिक्षण द्यावे आणि नवीन पदांची निर्मिती करावी, अशा प्रमुख मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत. मंत्रालय, न्यायालये व प्रशासकीय कामांसाठी स्टेनो अत्यंत महत्त्वाचे असून AI मुळे ही गरज संपलेली नाही, असे मत संघटनेचे अध्यक्ष तुषार देशमुख यांनी व्यक्त केले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ठाम निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here